बोईसरमधील सीटीइएस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात शिक्षिकांकडून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश; ‘सावित्रीचे महिमा गीत’ सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी


बोईसरमधील सीटीइएस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात

शिक्षिकांकडून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश; ‘सावित्रीचे महिमा गीत’ सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप

पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी

Oplus_16908288

बोईसर : जागतिक महिला दिनानिमित्त बोईसर येथील सीटीइएस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून स्त्री सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान शाळेतील महिला शिक्षिकांनी स्त्री सक्षमीकरण तसेच शिक्षण क्षेत्रात महिला शिक्षकांची भूमिका याविषयी आपले विचार मांडले. तसेच शिक्षिकांनी प्रा. जनार्दन शिंदे रचित “सावित्रीचे महिमा गीत” सादर करून उपस्थितांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. सुधीर भांडवलकर यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणात सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. सूर्यनमस्कारामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सीटीइएस स्कूलचे सीईओ जे. बी. शिंदे, डेप्युटी सीईओ अनिल संखे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी नाईक तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महिला दिनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.


11
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!