खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रयत्नांना यश: दादर-भुसावळ खांदेश एक्सप्रेसला बोईसर आणि डहाणू रोड येथे थांबा मंजूर*


*खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रयत्नांना यश: दादर-भुसावळ खांदेश एक्सप्रेसला बोईसर आणि डहाणू रोड येथे थांबा मंजूर*

Oplus_16908288

*नवी दिल्ली / पालघर:*
प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-भुसावळ खांदेश एक्सप्रेसला (गाडी क्र. १९००३/१९००४) बोईसर आणि डहाणू रोड रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच, या गाडीच्या फेऱ्या आता आठवड्यातून ३ दिवसांवरून वाढवून ६ दिवस करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी एका अधिकृत पत्राद्वारे (पत्र क्र. 2026/Chg/16/WR/52) माननीय खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांना या निर्णयाची माहिती दिली आहे.

*निर्णयातील ठळक मुद्दे:*

– खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी ७ मार्च २०२६ आणि १६ एप्रिल २०२६ रोजी पत्र पाठवून डहाणू रोड आणि बोईसर रेल्वे स्थानकांवर जनसुविधेसाठी गाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती.
– या पत्रांची दखल घेत रेल्वे प्रशासनाने गाडी क्र. १९००३/१९००४ दादर पश्चिम – भुसावळ खांदेश एक्सप्रेसला बोईसर आणि डहाणू रोड स्थानकांवर अधिकृत थांबा मंजूर केला आहे.
– यासोबतच, या गाडीचे परिचालन आठवड्यातून ३ दिवसांवरून ६ दिवस करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जनसुविधेमध्ये मोठी भर पडणार असून, बोईसर आणि डहाणू परिसरातील नागरिकांचा व प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!