भाजपा पालघर शहर मंडळाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात


 

भाजपा पालघर शहर मंडळाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
प्रतिनिधी गंगाधर जामनिक
पालघर दि ७-
पालघर शहरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काही ठिकाणी नागरिकांना अन्न शिजविणेही शक्य झाले नाही.
दि. ६ जुलै रोजी भारतरत्न डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, पालघर शहर मंडळाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. मुसळधार पावसामुळे प्रतिकूल परिस्थिती असतानाही शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून डॉ. मुखर्जी यांना आदरांजली अर्पण केली.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या *अंत्योदय* अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याच्या विचारातून प्रेरणा घेत, भाजपा पालघर शहर मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री जयेश रघुनाथ आव्हाड यांनी पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार शहर मंडळाचे दोन्ही सरचिटणीस, महिला मोर्चा शहर अध्यक्षा तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालघर (पूर्व) येथील *धापशी पाडा* आणि *गणेश नगर* परिसरात जाऊन ज्या कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते व ज्यांच्या घरी चूल पेटली नव्हती अशा गरजू नागरिकांना जेवणाच्या 400 पाकिटांचे वाटप केली.
भारतीय जनता पार्टी पालघर शहर मंडळाच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश देण्यात आला. भविष्यातही गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी भाजपा पालघर शहर मंडळ सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
**********


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!