जव्हार नगरपरिषद मध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पूजा उदावंत यांनी घेतली प्रचारात आघाडी. -आमदार हरिश्चंद्र भोये

पालघर -जव्हार नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार हरिश्चंद्र भोये यांनी जव्हार नगरपरिषद मध्ये भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारात घेतली आघाडी असे
त्यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राजकीय घडामोडींना वेग आला असून पूजा उदावंत या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
याबाबत विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये हे पत्रकारांशी बोलताना म्हणालेत की,
“पूजा उदावंत म्हणजे केवळ एक नाव नाही—त्या लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या, त्यांची अडचण समजून घेणाऱ्या खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्या आहेत. जनतेच्या समस्या ऐकून त्यावर तत्परतेने उपाय शोधण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळेच पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून उमेदवार म्हणून पुढे केले आहे.”
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार भोये यांनी पूजा उदावंत यांना मिळणाऱ्या जनसमर्थनाबद्दलही समाधान व्यक्त केले. त्यांच्या उमेदवारीमुळे जव्हार नगरपरिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. तसेच जव्हार नगरपरिषदेमध्ये विकासात्मक कामे करुन शहरांमध्ये चांगल्याप्रकारे सूविधा देण्यास आपण प्राधान्य देवू असे मत नगराध्यक्षपदाकरीता निवडणुकीत उभे असणाऱ्या पुजा उदावंत यांनी व्यक्त केलै

