जिल्हा परिषद पालघर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


  • जिल्हा परिषद पालघर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
    Oplus_16908288

    पालघर दि २६:-
    जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत मानवंदना स्वीकारली.
    या कार्यक्अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.) इजाज अहमद शरीकमसलत तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
    यानंतर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु. संचिता लोतडा (ज्ञानमाता मुलींचे वसतिगृह, उपलाट, ता. तलासरी) हिला प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व 3000 रु .चा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
    यावेळी विजेत्या विद्यार्थिनीचे तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!