डॉ. अॕड.निलेश राऊत, पालघर – यांच्या जन्मदिनानिमित्ताने 🎂🎂🌹🌹हार्दिक शुभेच्छा*


डॉ. अॕड.निलेश राऊत, पालघर – यांच्या जन्मदिनानिमित्ताने 🎂🎂🌹🌹हार्दिक शुभेच्छा*

Oplus_16908288

पालघर ( प्रतिनिधी) दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी, अॕड. / डॉ. निलेश रमेश राऊत यांच्या जन्म दिनानिमित्त, मी आजपर्यंत निलेश राऊत यांच्या बरोबर राहून जे पाहिले, अनुभवले, ते शब्दात सांगता येणार नाही. कारण उगवत्या सुर्याच्या तेजाकडे पाहणं सर्वांनाच शक्य होत नाही. तसेच निसर्गाची किमया अलौकिक आहे. “जेन देखे रवी ओ देखे कवी”.
निलेश राऊत यांचा जन्म समुद्र किनारा बसलेल्या दातिवरे,या एका लहान गावात झाला. जे सफाळे रेल्वे स्टेशन पासून पश्चिमेलाअंदाजे १२ ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. पुर्वा या गावात, जाण्या येण्यासाठी घोडागाडी किंवा महाराष्ट्र शासनाच्या फक्त बसेस उपलब्ध असायच्या.आता अनेक प्रकारची वाहने उपलब्ध आहेत.
श्री. निलेश राऊत हे शैक्षणिक शिक्षण घेत असतानाच लेखन, गायन, वाचन, पत्रकारीता, या बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शेत्रात कार्य करण्याची आवड असल्याने,ते कार्य करीत असताना, कळत नकळत ते कधी राजकीय क्षेत्रातील रथी महारथी यांच्या सान्निध्यात आले हे त्यांना कळेल नाही.
यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी दातिवरे पालघर दातिवरे असे नियमित जाणें येणे करावे लागत असे. यामध्ये वेळेचे बंधन येऊ लागले यासाठी ते पालघर मध्येच राहत आहेत. ते स्वतः पदवीधर,अॕड., पत्रकार, कवी, लेखक गायक, वादक असल्याने त्यांच्या सामाजिक, कार्याची नोंद घेत. ” अमेरिकेतील वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी” यांच्या कडून सन २०२५ साली, भारताची राजधानी नवी दिल्ली येथे, त्यांना *मानद डॉक्टर* पदवी देऊन मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री .निलेश राऊत यांचा कार्याचा लेखाजोखा पहाता तो शब्दात सांगता येणार नाही. त्यांनी पत्रकारिता शेत्रात मुंबई विद्यापीठा पदवी घेतली आहे. त्यांच्या चौफेर फटकेबाजीची आणि गुणवत्तेची दखल घेत. महाराष्ट्रातील अनेक संस्था, संघटना यांनी त्यांना सन्मानित केले आहे.
१) श्री. श्रावण स्मृती मंच, धारावी – मुंबई आयोजित कविता व स्पर्धा सन २००० – सन्मानपत्र २) प्रगती विद्यार्थी संघ चेंबूर मुंबई राज्य स्तरीय निबंध स्पर्धा १००१ सन्मान.३) साहित्य अस्वाद मंच म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार आयोजित कथा स्पर्धा सन २००३ विशेष सहभाग सन्मान पत्र, ४) सामाजिक समरसता मंच लोअर परेल मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन २००३, सन्मान पत्र, ५) मैत्रीय फाउंडेशन विरार आयोजित मुंबई विभाग काव्य वाचन स्पर्धा सन २००४, सन्मान पत्र,६) साहित्य कला यात्री पुणे यांच्या तर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार २००४, सन्मान पत्र, ७) मैत्री संस्था मुंबई आयोजित काव्य वाचन स्पर्धा सन्मान पत्र २००६, ८) युसुफ मेहेर अली, युवा बिरादरी मुंबई आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा सन २००६, सन्मान पत्र. ९) स्वरमयी संस्था अंधेरी मुंबई यांच्या वतीने, सांस्कृतीय व सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल राज्यस्तरीय “महाराष्ट्र अपंग मित्र” फिलोशीप सन्मान २००६, १०) एकता कल्चरल अकादमी महाराष्ट्र – ठाणे तर्फे एकता सांस्कृतिक महोत्सव काव्य स्पर्धा उत्तेजनार्थ पुरस्कार २००७, ११) न्यायिक लढा पत्रकार संस्था ठाणे यांच्या वतीने ” न्यायिक लढा साहित्य पुरस्कार २००७, १२) युवा सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र – मुंबई यांच्या कडून, क्रांतीसुर्य महात्मा फुले, सामाज भुषण पुरस्कार २००८, १३) तुषार पब्लिकेशन वसई जि. पालघर यांच्या तर्फे उत्कृष्ट कविता – सन्मान पत्र २००८, १४) महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा सन्मान,१५) एकता कल्चरल अकादमी मुंबई यांच्या वतीने,सन २०११ – १२ वृत्तपत्र लेखन क्षेत्रातील कार्याबद्दल कै. प्रबोधनकार ठाकरे – स्मृती पुरस्कार, १६) महिला आर्थिक विकास महामंडळ व आदर्श शैक्षणिक संस्था यांच्या वतीने आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०२३, १७) प्रजा सुराज्य ट्रस्ट वसई, यांच्या तर्फे सामाजिक कार्यकरीता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०२३, १८) दै. नवभारत ( हिंदी ) व दै नवराष्ट् या वृत्त समुहाच्या वतीने, आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०२३, १९) जनहित फाउंडेशन महाराष्ट्र व संघर्ष नायक मिडिया यांच्या वतीने, सामाजिक क्षेत्रासाठी आत्मसन्मान गौरव पुरस्कार २०२४, २०) मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल समाजभूषण २०२४ ने सन्मानित,२१) सफाळे लायन्स क्लब यांच्या तर्फे सामाजिक कार्यकरीता समाज भुषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित, तर २०२५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी यांच्या कडून श्री. निलेश राऊत यांना “मानद डॉक्टर” पदवीने नवी दिल्ली येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात येऊन त्यांच्या चौफेर कार्याची पोच पावती मिळाली आहे.
श्री.निलेश राऊत यांची सर्वच क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी असल्याने, व आमदार / खासदार यांच्या खाजगी सचिव पदाचा २ दशकांचा अनुभव बरोबर असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, राजकीय क्षेत्रातील धुरंधर नेत्यांनी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पालघर जिल्हा प्रमुख पदी २ वर्षांपासून नेमणूक केली आहे. राजकीय क्षेत्रांतील माजी राज्यमंत्री, माजी खासदार आणि आताचे आजी आमदार मा.श्री राजेंद्र गावित यांच्या खाजगी सचिव पदावर कार्यरत आहेत. या हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्त्यांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, पुढील येणाऱ्या काळात अशीच लोकसेवा घडावी, ईश्वरचरणी प्रार्थना.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!