पालघरमध्ये आरोग्य सुविधांवर भर : आमदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षेतेखाली आढावा बैठक
Oplus_16908288Oplus_16908288
पालघर | दि१३:-
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि दर्जेदार बनवण्यासाठी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी
आज दि १३ एप्रिल २०२६ रोजी पालघर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीत जिल्हा रुग्णालय तसेच मनोर येथील ट्रामा केअर हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा संबंधीत अधिकाऱ्यांच्या समवेत घेण्यात आला. याबैठकीला जिल्हा शल्य, ,चिकित्सक डॉ रामदास मऱ्हाड,कार्यकारी अभियंता महेंद्र किणी,अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या काळात आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा मेडिकल कॉलेजसंदर्भातही महत्त्वाची माहिती समोर आली. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ महेंद्र कुराडे यांनी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. या प्रस्तावानुसार, जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांची क्षमता, 430 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आणि सुमारे 692 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प उभारण्याची योजना आहे.
या प्रस्तावामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठीही उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होणार आहे.
एकूणच, या आढावा बैठकीत राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थे बाबत विविध प्रश्नांवर चर्ची केली ,गती देण्याचा ठोस प्रयत्न होत असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
,…