भाजपमध्ये अशोक अंबुरे–वैशाली चव्हाण यांच्या वादाच्या व्हिडिओ व्हायरलमुळे पत्नीच्या नगरसेवक उमेदवारीवर होणार मतदारांना पपालघररिणाम
पालघर -पालघर नगर परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षातील अंतर्गत वादाचा एक व्हिडिओ सध्या पालघरमध्ये जोरदार व्हायरल झाला असून, भाजपचे प्रमुख पदाधिकारी अशोक अंबुरे आणि पक्षात काही महिन्या पूर्वी प्रवेश घेतलेल्या वैशाली चव्हाण यांच्यात झाल्याचे सांगितल्या जाणाऱ्या धक्काबुककीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
या व्हिडिओमध्ये गोंधळ, ढकलाढकलीसारखे प्रसंग आणि कार्यकर्त्यांमधील तणावाचे क्षण दिसत असल्याचे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या प्रसंगादरम्यान अशोक अंबुरे यांच्या पत्नी — ज्या या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत — त्या देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे दृश्यात दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गोंधळ वाढला
या व्हिडिओमुळे पालघरमधील भाजप संघटनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सामान्यतः निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षांतर्गत शिस्त आणि एकजूट दिसणे अपेक्षित असते; मात्र येथे उलट चित्र दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
स्थानिक राजकीय वर्तुळात असा सवाल उपस्थित होत आहे की,
“पक्षातील नेते एकमेकांतच भिडत असतील, तर नागरिकांचा विश्वास कसा जिंकणार?”
अंबुरे दाम्पत्याच्या उमेदवारीवर काळे ढग?
….

