मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नावाचा व्हॉट्सअॅपवर गैरवापर; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन*


*मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नावाचा व्हॉट्सअॅपवर गैरवापर; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन*

Oplus_16908288

पालघर दि १५ – जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नावाचा व छायाचित्राचा वापर करून अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर संदेश पाठविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्वतः मनोज रानडे यांनी नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नावाचे प्रोफाइल फोटो लावून तसेच थायलंडचा देशकोड असलेल्या +66 915453693 या क्रमांकावरून काही नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना संदेश पाठविले जात आहेत. हा क्रमांक अथवा इतर कोणत्याही अज्ञात क्रमांकावरून त्यांच्या नावाने संदेश आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच अशा संदेशांना कोणताही प्रतिसाद देऊ नये, आर्थिक व्यवहार करू नयेत किंवा वैयक्तिक व गोपनीय माहिती शेअर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहून अशा बनावट संदेशांपासून सावध राहावे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी हा इशारा अधिकृतरीत्या जाहीर करत सर्व संबंधितांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!