*विज्ञान शाखेत इयत्ता 12 मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे*
पालघर दि २७ जानेवारी : पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे अश्या विद्यार्थानी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळविण्याकरिता अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पालघर या कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
सदर अर्ज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ https://etribevalidity.trti-maha.in/ या लिंकवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता समितीच्या वतीने आवाहन आले .
Views: 234

