जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न


 

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Oplus_16908288
Oplus_16908288

 

पालघर दि ३१:- पालघर जिल्हा परिषद येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर तसेच सर्व विभाग प्रमुख,गट विकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धांचे उद्घाटन झाले.
युनियन बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक मुकेश कुमार बब्बर आणि सहायक महाप्रबंधक सावन शिव हे देखील उपस्थित होते. युनियन बँक ऑफ इंडियाने या क्रीडा स्पर्धांसाठी व्हिडिओग्राफीचे प्रायोजकत्व तसेच खेळाडूंच्या किटचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. यामध्ये खेळाडूंसाठी शर्ट आणि ट्राउझर्सचा समावेश आहे.
जिल्हा परिषद मुख्यालय आणि मोखाडा तालुका यांच्यातील कबड्डी सामन्याने स्पर्धांचा शुभारंभ झाला. जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी यांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला.
या स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक, संगीत खुर्ची, कॅरम, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, धावणे, रिले, रांगोळी यासह इतर विविध क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. तीन दिवस चालणार असलेल्या या स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खेळभावना, संघभावना आणि उत्साह निर्माण झाला.
सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी विजेत्या संघ व खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आहे, तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने क्रीडा स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. एकाच ठिकाणी सर्व खेळांचे आयोजन झाल्यामुळे खेळाडूंना उत्तम सोय झाली, असे त्यांनी नमूद केले. तसेच, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या ताणातून मुक्ती देणारा हा सकारात्मक विरंगुळा असून, अशा उपक्रमांमुळे आरोग्य, मनोबल आणि कार्यक्षमता वाढते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
याशिवाय, वाडा तालुक्यातील एका खेळाडू विद्यार्थ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीदरम्यान लक्षात आले की, त्याच्याकडे खेळण्यासाठी योग्य जोड्या (शूज) आणि कपडे उपलब्ध नाहीत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या विद्यार्थ्याला नवीन खेळाचे जोडे (स्पोर्ट्स शूज) आणि आवश्यक कपडे प्रदान केले, ज्यामुळे त्याच्या खेळण्यातील उत्साह अधिक वाढला.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!