आमदार विलास तरे यांचे विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन # सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकत भारताने रचला इतिहास; क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाचा


आमदार विलास तरे यांचे विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

# सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकत भारताने रचला इतिहास; क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाचा

Oplus_16908288

क्षण

पालघर. ( प्रतिनिधी ) – आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला असून ही कामगिरी देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाची आणि आनंदाची पर्वणी आहे, अशा शब्दांत आमदार विलास तरे यांनी विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर पूर्ण वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी धडाकेबाज खेळी करत धावांचा भक्कम पाया उभारला, तर गोलंदाजांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि संघभावना यामुळे भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवला.

क्रिकेट हा सांघिक खेळ असल्यामुळे या ऐतिहासिक विजयात संघातील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी तसेच व्यवस्थापनाचे मोठे योगदान आहे. भारतीय संघाने आपल्या उत्कृष्ट खेळातून जगभरातील क्रिकेटप्रेमींना भारतीय क्रिकेटची ताकद, जिद्द आणि कौशल्य दाखवून दिले आहे.

  1. या विजयानंतर आनंद व्यक्त करताना आमदार तरे म्हणाले की, भारतीय संघाने आज दाखवलेली जिद्द आणि सांघिक खेळ वाखाणण्याजोगा आहे. फायनलमध्ये मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशाने देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. कर्णधार आणि सर्व खेळाडूंचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही आ. तरे म्हटले आहे. तसेच, कामगिरीबद्दल आमदार विलास तरे यांनी भारतीय संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षकवर्ग आणि व्यवस्थापनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठीही भारतीय संघाला भरघोस यश मिळो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
    ——————————————
    जनसंपर्क कार्यालय, ढेकाळे, पालघर.
    ——————————————

14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!