पालघर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध निवड


पालघर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध निवड

आजचे प्रवचनकार आजचे प्रवचनकार
Oplus_16908288
Oplus_16908288

 

पालघर(प्रतिनिधी ): पालघर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची कार्यकारिणी निवड नुकतीच राज्य सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष सुचित घरत व जिल्हा सरचिटणीस आर. एल. पाटील यांच्या निरीक्षणाखाली पार पडली. या निवड प्रक्रियेत संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
निवडीनुसार अध्यक्षपदी श्री. नितीन देवू पवार, सचिवपदी श्री. मयूर राजेंद्र पाटील, तर कार्याध्यक्षपदी श्री. राजेंद्र परशुराम गाडेकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष (महिला) म्हणून श्रीमती भारती दीपक कांबळे व उपाध्यक्षपदी श्री. अरविंद तुकाराम संखे यांची निवड झाली.
कोषाध्यक्षपदी श्री. प्रकाश चंद्रकांत पाटील, सहसचिवपदी श्री. रोहित वळवी, संघटकपदी श्री. सुदर्शन सुतार यांची निवड करण्यात आली. महिला संघटक म्हणून मेघना मनीष संखे व मानसी मयूर लाटे यांची निवड झाली. तसेच सल्लागारपदी श्री. संतोष बंडू पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी श्री. राहुल पऱ्हाड यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. बिपीन महादेव जाधव, श्री. रमेश रायभान उंदरे आणि श्री. निलेश देवरे यांची निवड करण्यात आली.
नवीन निवड झालेल्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!