मनोरजवळ शगुन ग्राउंड परिसरात झाड कोसळून टेम्पोचे नुकसान वार्ताहर – अनिल साळुंखे


L

मनोरजवळ शगुन ग्राउंड परिसरात झाड कोसळून टेम्पोचे नुकसान

वार्ताहर – अनिल साळुंखे

Oplus_16908288

मनोर,08/04/26
पालघर मनोर महामार्गावर बुधवारी दुपारी मनोर नजीक शगुन ग्राउंड परिसरात अचानक घडलेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. शगुन ग्राउंडच्या कंपाउंडमधील एक मोठे झाड रस्त्यालगत उभ्या असलेल्या टेम्पोवर कोसळल्याने ही घटना घडली.

या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून झाडाच्या फांद्या रस्त्यावर पसरल्याने मनोर मस्तान नाका दरम्यान महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अचानक निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखेचे अंमलदार मोहन मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणाचे काम हाती घेतले. क्रेनच्या साहाय्याने महामार्गावर कोसळलेले झाड हटवण्यात आले. त्यानंतर काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

झाड कोसळताना विजेच्या तारा तुटल्याने नवी वस्ती परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तारा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!