खासदार आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद;* *तलासरी जनता दरबारात ८० अर्जांवर तात्काळ कार्यवाही*


*”खासदार आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद;*

*तलासरी जनता दरबारात ८० अर्जांवर तात्काळ कार्यवाही*

Oplus_16908288
Oplus_16908288

अनिरुद्ध मिश्रा / पालघर :-जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरित व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने “खासदार आपल्या दारी – जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले.

सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती सभागृह, तलासरी येथे जनता दरबार पार पडला. या माध्यमातून नागरिकांना थेट खासदारांसमोर आपल्या तक्रारी, सूचना व अपेक्षा मांडण्याची संधी उपलब्ध झाली.

तलासरी येथील जनता दरबारात विविध विभागांकडून एकूण ८० अर्ज प्राप्त झाले. त्याचे विभागनिहाय विवरण पुढीलप्रमाणे आहे:
• पंचायत समिती तलासरी – ४२
• तहसील कार्यालय, तलासरी – १६
• तालुका कृषी अधिकारी, तलासरी – २
• नगरपंचायत तलासरी – २
• महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL), तलासरी – ४
• वनविभाग – १
• सार्वजनिक बांधकाम विभाग, तलासरी – ४
• राष्ट्रीय महामार्ग – २
• उप विभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी – ४
• लघु पाटबंधारे विभाग – १
• दुग्ध प्रकल्प दापचरी – २

जनता दरबारात संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये त्वरित निर्देश देण्यात आले असून उर्वरित प्रकरणांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पारदर्शक प्रशासन, थेट संवाद आणि विकासाभिमुख निर्णयप्रक्रिया यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. जनतेच्या सक्रिय सहभागामुळे प्रशासन अधिक जबाबदार व परिणामकारक बनत असून विकासकामांना गती मिळत आहे.

भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सदर प्रसंगी तलासरी चे तहसीलदार श्री. अमोल पाठक, भाजपा अध्यक्ष तलासरी श्री. विवेक करमारे, PI अजय गोरड, प्रदेश पदाधिकारी धर्मा गोवारी, सुरेश शिंदा, सरचिटणीस सुभाष हाडळ, उपाध्यक्ष प्रवीण कापडी, विजय अकरे, मा. पं.स सदस्य प्रकाश सांबर, मा. सरपंच लुईस काकड, सचिव पांडुरंग करमोडा, कोषाध्यक्ष सुनील मासमार, विष्णु काकड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!