दांडेकर महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शिष्यवृत्ती उपक्रम


दांडेकर महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शिष्यवृत्ती उपक्रम

Oplus_16908288
Oplus_16908288

वार्ताहर – नाझीम खतीब

मनोर,24/04/26
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविणाऱ्या एकूण १२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून, या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठा आधार मिळणार असून त्यांच्यात आत्मविश्वासही वाढणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करत आहेत. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण व निम्न आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना नवे बळ मिळत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होत आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!