दांडेकर महाविद्यालयात ‘ईएसएसजी–२०४७’ आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न


दांडेकर महाविद्यालयात ‘ईएसएसजी–२०४७’ आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

  1. Oplus_16908288

    वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर,28/04/26
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक प्रगती आणि सुशासन : भारताचे व्हिजन–२०४७ (ईएसएसजी–२०४७)’ या विषयावर एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय परिषद प्रत्यक्ष तसेच आभासी पद्धतीने उत्साहात संपन्न झाली. इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र विभाग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएम–उषा) अंतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेच्या उद्घाटन सत्रात मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. लियाकत खान यांनी मार्गदर्शन करताना ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेत सुशासनाची भूमिका अधोरेखित केली. प्रमुख वक्ते म्हणून अमेरिकेतील सॅलिसबरी विद्यापीठाचे व्हिजिटिंग प्राध्यापक डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी “भारताची २०४७ ची दृष्टी” या विषयावर सखोल विचार मांडले. प्रख्यात भूगोलतज्ञ डॉ. हेमंत पेडणेकर यांनी शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले.

परिषदेतील विविध तांत्रिक सत्रांमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील प्रा. (डॉ.) संभाजी शिंदे, अमेरिकेतील ह्युस्टन येथील श्री. विजयानंद शेलवराज, पुणे (वाघोली) येथील डॉ. ज्योतिराम मोरे तसेच उत्तर प्रदेशातील आय.आय.एम.टी. विद्यापीठाच्या डॉ. तुष्टी शर्मा यांनी विशेषतज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक प्रगती आणि सुशासन या विषयांच्या विविध पैलूंवर त्यांनी सखोल चर्चा घडवून आणली.

या परिषदेस देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण २४० संशोधनपत्रे व शोधनिबंध सादर करण्यात आले. ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाला बळकटी देणारे विचार, चर्चासत्रे आणि संवाद यांद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आले.

समारोप सत्रात संशोधकांनी आपले शोधनिबंध पीपीटीच्या माध्यमातून ऑनलाईन सादर केले. कला, वाणिज्य व विज्ञान अशा तीन गटांत विभागणी करून प्रत्येक गटातील उत्कृष्ट तीन शोधनिबंधांना आयोजकांतर्फे गौरविण्यात आले.

परिषदेचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. किरण सावे होते. पीएम–उषा समन्वयक डॉ. महेश देशमुख यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. संयोजक म्हणून उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) तानाजी पोळ, भूगोल विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब राहाणे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. हर्षद वनमाळी तसेच इतिहास विभागप्रमुख सहा. प्रा. रामदास येडे यांनी कार्य पाहिले. सहसंयोजक म्हणून प्रा. दीपक वाणी यांनी सहकार्य केले.

संस्थेचे अध्यक्ष सीए. सचिन कोरे यांच्या शुभेच्छा परिषदेच्या यशाला लाभल्या. उपाध्यक्ष श्री. सुधीर दांडेकर यांनी उपस्थित राहून परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपाध्यक्ष श्री. धनेश वर्तक, सचिव श्री. सुधीर कुलकर्णी व श्री. अनिल पाटील यांनीही सहकार्य करत अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!