दिव्यांग पुनर्वसन केंद्रात भरती व नुतनीकरणाची मागणी* *भाजपचे आमदार राजन नाईक यांचे दिव्यांग कल्याण सचिव यांना निवेदन*


*दिव्यांग पुनर्वसन केंद्रात भरती व नुतनीकरणाची मागणी*
*भाजपचे आमदार राजन नाईक यांचे दिव्यांग कल्याण सचिव यांना निवेदन*

    Oplus_16908288

नालासोपारा, (प्रतिनिधी) : विरार येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात रिक्त कर्मचाऱ्यांची भरती आणि धोकादायक इमारतीच्या नुतनीकरणासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार राजन नाईक यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन केली. त्याचबरोबर विरार येथील श्री ट्रस्टच्या मतीमंद व कर्णबधीर शाळेसाठी प्रलंबित वेतनेतर अनुदान देण्याचीही मागणी केली आहे. या मागणीबाबत सचिव तुकाराम मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन महिनाभरात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
राज्यातील दिव्यांगाच्या प्रबोधनासाठी पालघर जिल्ह्यातील विरार येथे अनेक वर्षांपासून अस्तित्वातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या केंद्रात दिव्यांगासाठी साहित्य तयार केले जात असून, यापूर्वी १५ कर्मचारी कार्यरत होते. मात्र, सध्या केवळ चार कर्मचारी कार्यरत असून, दिव्यांग पुनर्वसन केंद्राची इमारतही जुनी झाली आहे. धोकादायक श्रेणीतील या इमारतीच्या दुरुस्तीबरोबरच नुतनीकरणाची आवश्यकता आहे, याकडे आमदार राजन नाईक यांनी लक्ष वेधले आहे.
दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुलभतेने सुरू राहण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करावी. तसेच केंद्राच्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली आहे.
प्रलंबित अनुदानाची मागणी
विरार येथील श्री ट्रस्ट संचालित स्वामी परिज्ञानाश्रम शैक्षणिक व व्यावसायिक केंद्रामध्ये मतिमंद व कर्णबधिरांना शिक्षण दिले जाते. या शाळेचे २०१४ पासून २०२५ पर्यंत वेतनेतर अनुदान थकीत आहे. तसेच गेल्या २ वर्षांपासून पाच मंजूर शिक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. या शाळेत १०० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या शाळेच्या सुरळीत कामकाजासाठी थकीत वेतन व वेतनेतर अनुदान जमा करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली आहे.
या प्रश्नांबाबत सचिव तुकाराम मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच त्याबाबत महिनाभरात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती भाजपा जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!