धानीवारीजवळील भीषण रस्ता अपघातात मध्ये १३ जणांचा मृत्यू .यामध्ये मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना ५लाखाची मदत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कडुन जाहिर.


धानीवारीजवळील भीषण रस्ता अपघातात मध्ये १३ जणांचा मृत्यू .यामध्ये मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना ५लाखाची मदत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कडुन जाहिर.

Oplus_16908288

नाझीम खातिब बातमीदार
पालघर दि १८:-
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे झालेल्या भीषण अपघातानंतर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि प्रशासनाकडून उपचारांची माहिती घेतली.
अपघातानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणा सतर्क असून जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जात असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. जखमी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासनाकडून घेतली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहितीही यावेळी गणेश नाईक यांनी दिली.

बाईट – गणेश नाईक, पालकमंत्री


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!