नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना २२ हजारांची रोकड लंपास वार्ताहर – अनिल साळुंखे


नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना

२२ हजारांची रोकड लंपास

वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर,04/04/26
मनोर पोलीस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाणे सांगे येथील रहिवासी डॉ. राहुल पाटील यांच्यासोबत ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. पाटील हे काही कामानिमित्त मस्तान नाका येथे आले होते. मनोर मस्ताना रस्त्यावर त्यांनी आपली गाडी उभी करून ते काही साहित्य आणण्यासाठी जवळच गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गाडीला लक्ष्य केले.

प्रथम चोरट्याने हत्याराच्या सहाय्याने गाडीच्या डाव्या बाजूचे मागील टायर फोडले. त्यानंतर पुढील काच फोडून गाडीत प्रवेश केला. सीटवर ठेवलेली सुमारे २२ हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली. संपूर्ण प्रकार काही मिनिटांत घडल्याने परिसरातील नागरिकही हतबल झाले.

नागरिकांमध्ये असुरक्षितता

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने विशेष चिंतेची बाब म्हणजे ही चोरी घरवस्तीच्या परिसरात आणि दिवसाढवळ्या झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक गस्त घालावी तसेच आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!