नालासोपारा विधानसभा मतदारसंघात मॅंग्रोव्ह पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू* *भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून पाहणी


*नालासोपारा विधानसभा मतदारसंघात मॅंग्रोव्ह पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू*

  1. *भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून पाहणी
    Oplus_16908288
    Oplus_16908288

    *

अनिरुद्ध मिश्रा /नालासोपारा :- वसई-विरार शहराच्या पर्यटनात मानाचा तुरा ठरणारे १०० कोटी रुपयांचे कांदळवन (मँग्रोव्ह) पार्क नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मारंबळपाडा खाडी परिसरात उभारण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याने जवळपास सहा एकर जागेवर प्रशस्त मँग्रोव्ह पार्क उभारण्याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. या दौऱ्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वसई-विरारच्या विकासाला वेग येणार आहे.

कांदळवनांच्या विविध प्रजातींचे संवर्धन व्हावे, त्याची माहिती नागरिकांनाही मिळावी, याशिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेही वसई-विरार शहराचा विकास व्हावा, यासाठी नालासोपारा विधानसभा मतदारसंघात मँग्रोव्ह पार्क उभारण्याची आमदार राजन नाईक यांनी मागणी केली होती. त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांनी विशेष बैठक घेतली होती. त्यावेळी मँग्रोव्ह पार्क उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहेत.

भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोकण विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर राक्षे, वन परिक्षेत्र प्रतीक मोडवान, वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार दीपक गायकवाड, वनपाल अंगद दत्तनुरे यांची उपस्थिती होती. या वेळी विरोधीपक्ष नेते मनोज पाटील, जिल्हा महामंत्री मनोज बारोट, गटनेता अशोक शेळके, नगरसेवक जितेंद्र पाटील, जयप्रकाश वझे, संजोग यंदे, शहर अध्यक्ष विशाल राऊतसहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यसंख्येने उपस्थित होते.

विरारनजीकच्या मारंबळपाडा येथील नवीन जेट्टी व जुनी जेट्टी दरम्यान मँग्रोव्ह पार्क उभारले जाणार आहे. तसेच समुद्र जीव अभ्यासासाठी ओपन डेक उभारण्यात येणार आहे.

यापुढील काळात विरार पूर्व येथे बर्ड पार्क, महापालिकेच्या आरक्षित जागांवर सुशोभित उद्यान आणि आरक्षित जागांवर खेळांसाठी मैदान विकसित करण्यात येईल, असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!