पालघर जिल्हातील नागझरी व पेठ येथे जल अर्पण दिवस साजरा* *प्रभातफेरी, गावसभा, जलप्रतिज्ञा व पाणी शुद्धीकरण प्रात्यक्षिकाचे आयोजन*


 

*पालघर जिल्हातील नागझरी व पेठ येथे जल अर्पण दिवस साजरा*

*प्रभातफेरी, गावसभा, जलप्रतिज्ञा व पाणी शुद्धीकरण प्रात्यक्षिकाचे आयोजन*

Oplus_16908288
Oplus_16908288

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत योजना गावाला हस्तांतरण दिवस जल अर्पण दिवस म्हणून नागझरी (ता. विक्रमगड ) व पेठ (ता. डहाणू ) येथे आज विविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची काम प्रगती पथावर सुरू आहेत.गावातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे.त्यानुसार आज नागझरी (ता. विक्रमगड) व पेठ (ता.डहाणू) या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या या गावात सदरची योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अतुल पारसकर , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सुरूम यांच्या मार्गदर्शनाखाली आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी जल अर्पण दिवस गावात साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये आज गावातील पाणी पुरवठा योजनेची संपूर्ण माहिती गावसभेमध्ये ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात आली.गावात उत्सव साजरा करताना पाण्याचे महत्व ग्रामस्थांना कळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांची गावातून रॅली, जल प्रतिज्ञा, गावातून विद्यार्थी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांची प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच शुद्ध पाण्यासाठी (एफ.टी.के.) किटचे प्रात्यक्षिक दाखवून शुद्ध पाण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामपंचायत तवा महसूल पेठ येथे ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात आला त्याठिकाणी सचिन सुरुम जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, तालुका ग्रामीण पाणीपुरवठा ,रविराज अभंगराव कनिष्ठ अभियंता तसेच सरपंच.लहू सातवी…. उपसरपंच विनोद केदार व सदस्य ग्राम पाणी पुरवठा समिती (VWSC) सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी सखाराम सातवी, समूह समन्वयक दिनेश पाडवी गावातील ग्रामस्थ,महिला बचत गट सदस्य , शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

नागझरी ता.विक्रमगड येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी ग्रामदानं मंडळाचे अध्यक्ष रोहिदास डगला, उपअध्यक्ष नितीन डगला ,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन चे माहीती शिक्षण संवाद सल्लगार आत्माराम विशे, मनुष्य विकास सल्लागार संजय ठाकरे ग्रा.पा.पु विभागाचे,गट समन्वयक यतीन घरत स्वच्छ भारत मिशन (ग्रा ) चे अभियंता अक्षय सांबरे ग्रामपंचायत अधिकारी किरण भोईर , अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!