बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला आग.


 

बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला आग.

Oplus_16908288

 

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीला आग लागल्याची खबर मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आग लागलेल्या कारखान्याच्या गोदामामध्ये ज्वलनशील साहित्याचा मोठा साठा असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा येत आहे. घटनास्थळी पोलीस, महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या अपघाती घटनांमुळे परिसरातील नागरिक आणि कामगारांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जे ६२ वरील शिव इंडस्ट्रीज या कंपनीला सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीच्या गोदामामध्ये ज्वलनशील इंधनाचा मोठा साठा तसेच इंधन भरलेले तीन टँकर असल्यामुळे आगीची तीव्रता अधिकच वाढली आहे. या आगीमुळे बाजूच्या कंपन्यांमध्ये देखील आग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. आगीच्या घटनेच्या वेळी कंपनीमध्ये काही कामगार उपस्थित होते मात्र आग लागताच सुरुवातीच्या काळात ते तातडीने बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या दुर्घटनेमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.

हेही वाचा
शहरबात : आपत्कालीन व्यवस्थेची परीक्षा
घटनास्थळी प्रथम पोहोचलेल्या तारापूर प्रग्निशमन दलाच्या दोन बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होते, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे पालघर नगरपरिषद, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, अदानी पावर यांचे एकूण दहा अग्निशमन बंब आणि जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत आहेत. गोदामामध्ये साठवणूक करण्यात आलेल्या ज्वलनशील इंधनामुळे जवळपास १० पेक्षा अधिक स्फोट झाले असून यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा येत आहे. आगीमुळे बोईसर आणि खैरापाडा परिसरातील आकाशात काळेकुट्ट धुराचे मोठे लोट पसरले असून यामुळे नागरिक आणि कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस, महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!