महानगरपालिकेमार्फत क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा होणार सत्कार ;* *दि.13 मार्च रोजी सत्कार समारंभाचे आयोजन*


*महानगरपालिकेमार्फत क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा होणार सत्कार ;*

  1. *दि.13 मार्च रोजी सत्कार समारंभाचे आयोजन*
    Oplus_16908288

    विरार :-१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यांनी क्रिकेट विश्वचषक जिंकून देशासोबत वसई-विरार शहराचेही नाव उज्वल केले आहे. विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण भारतीय संघाने दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय असून संघाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रे यांचे योगदान यात अधिक महत्वाचे आहे. आयुष म्हात्रे यांच्या या योगदानाबद्दल वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या मा.महासभेत आयुष म्हात्रे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता.

क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांच्या कर्तुत्वास सन्मानित करण्यासाठी क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत सत्कार करण्यात येणार असून शुक्रवार दि.१३ मार्च २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!