वीरेंद्रनगरमध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर; २७० नागरिकांचा लाभ
पालघर दि २०:-— सध्याच्या काळात अनेक नागरिकांना डोळ्यांच्या तपासणीसाठी व चष्मा खरेदीसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः या भागात मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबे वास्तव्यास असल्याने त्यांच्या गरजा लक्षात घेऊन वीरेंद्रनगर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
St. Peter’s Church Palghar यांच्या पुढाकाराने आणि पालघर नगरपरिषदेच्या नगरसेवकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या शिबिरात नगरसेविका भारती सूरज धोत्रे, नगरसेवक सुनील हरिजन व रमेश किसन धोत्रे यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमादरम्यान तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तसेच गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २७० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. गरजू नागरिकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
वीरेंद्रनगरमध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर; २७० नागरिकांचा लाभ
- जाहिरात
- नवीनतम पोस्ट
- POLL

