हिवाळी अधिवेशन, नागपूर 
विक्रमगड तालुका व पालघर जिल्ह्यात वाढत्या सिकल सेल, तसेच विशेषतः स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ पदांच्या तातडीच्या भरतीसंदर्भात आज आमदार हरिश्चंद्र भोये साहेब यांनी मा. सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबीटकर साहेब यांची नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान भेट घेऊन सविस्तर मागणी मांडली. सदर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. विक्रमगड मतदारसंघातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी हा एक महत्त्वाचा पुढाकार असून, येत्या काळात नागरिकांना त्याचा निश्चित लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करतो.
Views: 342

