७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रा प पालघर विभागातील ८ आगारातील एकूण ४८ चालकांना अपघात विरहित सुरक्षित सेवा केल्याबद्दल सन्मान पत्र देवून सत्कार


७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रा प पालघर विभागातील ८ आगारातील एकूण ४८ चालकांना अपघात विरहित सुरक्षित सेवा केल्याबद्दल सन्मान पत्र देवून सत्कार

Oplus_16908288

पालघर दि २७ पालघर विभागातील रा प बोईसर आगारातील एकूण १४ चालकांना २५ वर्षे, २०वर्षे, १५वर्षे,१०वर्षे कालावधीचा सुरक्षित सेवा बिल्ला, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले.
रा प बोईसर आगारातील चालक श्री संजय वासुदेव कुर्ले बि क्र २५५९१ ह्यांना त्यांनी केलेल्या अपघात विरहित सेवेचा २० वर्षे कालावधीचा बिल्ला व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. चालक श्री संजय कुर्ले हे मितभाषी असल्याने त्यांची रा प म्हमंडळातील सेवा म्हणजे रस्त्यावरील हात दाखवणाऱ्या प्रवाशांस बस मध्ये प्रवासकरिता घेणे तसेच बस ने प्रवास करण्यास प्रवाशांना प्रेरणा देणे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व प्रवाशांना पटवून देणे. तसेच महामंडळातील सोई सवलती प्रवाशांना समजून सांगणे व सर्वांना सहकार्य करणे. चालक श्री कुर्ले यांनी रा प महामंडळाचे प्रवाशी वाढावे म्हणून रा प बसमध्ये सावित्रीबाई फुले मोफत पुस्तक वाचनालय चालू केलेले आहे. आतापर्यंत ८० प्रवाशांनी त्यांच्या ह्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. चालक संजय कुर्ले रा प सेवेबरोबर सामाजिक कार्यातसुद्धा सक्रिय सहभाग घेत असतात.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!