मनोर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा महसूल विभागाचे आवाहन वार्ताहर – अनिल साळुंखे


मनोर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा महसूल विभागाचे आवाहन

वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर,09/03/26
नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे जलदगतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आंबेडकर नगर, वेळगाव रोड, गाव मनोर येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनोर येथे पार पडणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच दिवशी उपलब्ध करून देणे हा आहे. या संकल्पनेअंतर्गत नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील व परिसरातील नागरिकांना विविध सरकारी सेवांसाठी कार्यालयांची वारंवार धावपळ करण्याची गरज भासणार नाही.

नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप

या विशेष शिबिरामध्ये विविध दाखले वाटप, सात बारा उताऱ्याचे अद्ययावत करणे, सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत पडताळणी व लाभ वाटप, ई मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, तसेच अभिलेख दुरुस्ती संदर्भातील मदत कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुरवठा विभागाशी संबंधित विषयांवर कार्यवाही, कृषी माहिती प्रणाली, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन आदी सेवा देखील नागरिकांना दिल्या जाणार आहेत.

लोकांना अनेक योजनांचा लाभ

याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा, तसेच अतिक्रमण व इतर महसुली विषयांबाबत मार्गदर्शन देखील या शिबिरात करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

लोकाभिमुख पारदर्शक गतिमान उपक्रम

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांचे त्वरित निराकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

भाविकांना लाभ घेण्याचे महसूल विभागाचे आवाहन

त्यामुळे मनोर व परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराला उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!