माक्सर्वादी लेनिनवादी पक्षाचा ‘शिमगा मोर्चा’ मनोर ते विक्रमगड 23 किलोमीटर पायी मोर्चा प्रतिनिधी – अनिल साळुंखे


माक्सर्वादी लेनिनवादी पक्षाचा ‘शिमगा मोर्चा’

मनोर ते विक्रमगड 23 किलोमीटर पायी मोर्चा

प्रतिनिधी – अनिल साळुंखे

आजचे प्रवचनकार

मनोर
पालघर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारताचा माक्सर्वादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) यांच्या वतीने मंगळवारी ‘शिमगा मोर्चा’ काढण्यात आला. मस्तान नाका येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली सदर मोर्चा मस्तान नाका ते विक्रमगड तहसीलदार कार्यालय पर्यत २३ किलोमीटर पायी लाँग मार्च काढण्यात आला आणि
आंदोलकांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर
मोर्चात पालघर जिल्ह्यातील विविध गावांमधील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात लाल बावट्यांचे झेंडे व विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला
या मोर्चातून रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची सुमारे ५२ कोटी ४५ लाख रुपयांची थकीत प्रलंबित मजुरी तातडीने देण्यात अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.आहे तसेच बोगस मस्टर काढून भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवकांवर कारवाई करावी, घरकुल लाभार्थ्यांना तातडीने घरकुल मिळावीत, प्रत्येक गरजू आदिवासी कुटुंबाला अंत्योदय योजनेप्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशा विविध मागण्याचे निवेदन यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले
मोर्चेकरांच्या मागण्या
या शिवाय जलजीवन योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा. प्रलंबित वनहक्क प्रकरणे निकाली काढावीत, शेतमालाला योग्य दर मिळावा तसेच विविध प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशा मागण्याही मोर्चातून करण्यात आल्या. आदिवासी पाड्यांमध्ये तातडीने वीज कनेक्शन देण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
कायदा सुव्यवस्था कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आलि आहे
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेत मोर्चा काढत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
*************


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!