*विविध विकास कामांवर पालिकेत महापौरांनी घेतली बैठक*

आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका महापौर परिषद दालन येथे माननीय महापौर श्री. अजिवजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध विकास कामावर बैठक पार पडण्यात आली.
मा. लोकनेते श्री. हितेंद्र ठाकुर व युवा आमदार श्री.क्षितिज ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकास कामांचा पाया मजबूत होण्यासाठी बैठक पार पडण्यात आली.
सदर या बैठकीत मा.उपमहापौर श्री.मार्शल लोपिस , युवा आमदार मा.क्षितिज ठाकूर, माजी खासदार श्री.बळीराम जाधव , माजी आमदार श्री.राजेश पाटिल तसेच बहुजन विकास आघाडी चे सर्व आजी माजी महापौर, उपमहापौर व सन्मा.पदाधिकारी तसेच विद्यमान नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रात चालू असलेल्या विविध कामांची परिपूर्ण माहीती देऊन येणाऱ्या काळात चालु असलेली कामे व नव्याने घेण्यात येणारी कामे यांना गती मिळावी या साठी उपस्थित असलेल्या अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्त, शहर अभियंता व इतर अधिकारी यांना आदेशीत केले.
अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे मा. नगरसेवक श्री.हार्दीक राऊत यांनी दिली.

