जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटरच्या कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडून पाहणी


 

जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटरच्या कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडून पाहणी

Oplus_16908288

पालघर दि १८-पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज पालघर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालय तसेच मनोर येथील ट्रॉमा सेंटरला भेट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालय व ट्रॉमा सेंटरच्या इमारतींची बांधकामे पूर्णत्वाच्या टप्प्यात असताना वीज, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, अभियंते तसेच ठेकेदार उपस्थित होते. रानडे यांनी विविध कामांची माहिती घेत प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीशी संबंधित उर्वरित बांधकामे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच वीज, पाणीपुरवठा, वैद्यकीय साहित्य उपलब्धता, मनुष्यबळ नियुक्ती आणि इतर पूरक कामे जुलैअखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत निश्चित नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पाहणीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटर कार्यान्वित झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. विशेषतः अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांसाठी तातडीच्या उपचारांची सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध होणार असल्याने आरोग्य सेवेला मोठी बळकटी मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक निर्देश दिले आहेत.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!