नागरिकांसाठी सुवर्णसंधी सफाळे मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांसाठी सुवर्णसंधी


नागरिकांसाठी सुवर्णसंधी

सफाळे मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांसाठी सुवर्णसंधी

Oplus_16908288

 

मनोर,16
सफाळे मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने भागातील नागरिकांसाठी भव्य ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या विशेष अभियानांतर्गत नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच दिवशी सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले वाटप, ७/१२ उतारे अद्यावत करणे, सर्व्हेअंतर्गत पट्टे वाटप, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, तसेच प्रलंबित फेरफार निकाली काढणे आदी महत्त्वाच्या सेवा नागरिकांना दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर पीकविमा, पीएम किसान योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही आणि सामाजिक व आर्थिक सहाय्य योजनांची माहिती व लाभही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

या शिबिरात अनेक मान्यवरांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप करण्यात येणार असून नागरिकांच्या विविध तक्रारी व प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महसूल विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, या संधीचा लाभ घेऊन आपल्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडाव्यात आणि शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा.

सफाळे परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!