नावझे ग्रामपंचायतीचा ‘माझी वसुंधरा ५.०’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बायस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण


नावझे ग्रामपंचायतीचा ‘माझी वसुंधरा ५.०’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बायस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Oplus_16908288
Oplus_16908288

मनोर,दि :-२१
राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व शाश्वत विकासासाठी नावझे ग्रामपंचायतीने शिकवणारी कामगिरी करत राज्यातील प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आज मुंबईतील एक प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बायस यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला मानपदवी आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रमांचे उत्तम नियोजन, अंमलबजावणी व नागरिकांचा सक्रिय सहभाग या गुणांमुळे राज्यभरातील गावांमध्ये नावझेला सर्वोच्च स्थान लाभले आहे. मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान नावझे गावासाठी अभिमानाची बाब असून संपूर्ण गावकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक ठरला आहे. इतर ग्रामपंचायतींसाठीही नावझेचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

पर्यावरणावर भर झाडे लावा झाडे जगवा उद्देश्य

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक उत्सवांमध्ये लाऊडस्पीकर व डीजेवर निर्बंध लागू केले आहेत. फटाक्यांवर बंदी घालून काही सार्वजनिक स्थळांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी बीज संकलन, ‘झाडे लावा–झाडे जगवा’ मोहीम, रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड तसेच बांबू, शेवगा व खस यांसारख्या हरित लागवड कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गावाचा हरित विकासाचा आदर्श

रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, तृणधान्य वापर प्रोत्साहन, शून्य कार्बन उत्सर्जन जनजागृती अशा उपक्रमांमुळे नावझे गावाने पर्यावरणपूरक व स्वच्छ गावाचा आदर्श निर्माण केला आहे.

काय होतेय नावझे मध्ये?

एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालून कापडी पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येते आहे. ओला व सुका कचरा विभाजन, सांडपाणी व्यवस्थापन, कृषी कचरा व्यवस्थापन तथा ई-कचरा संकलन यांसारख्या स्वच्छता कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला आहे.
घनकचऱ्यापासून कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती तसेच बायोगॅस प्रकल्पाद्वारे कचऱ्याचे उपयुक्त परिवर्तन हा ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.

जनजागृती आणि हरित जीवनशैली

रेन वॉटर हार्वेस्टिंग, आपत्ती व्यवस्थापन, वातावरणीय बदल व शून्य कार्बन उत्सर्जन या विषयांवर व्यापक जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. तृणधान्यांच्या उपयोगास प्रोत्साहन देऊन आरोग्य आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला जात आहे.

सुशोभीकरणातून नवा चेहरा

गावातील प्रवेशद्वार, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, सार्वजनिक सभागृह व ग्रामपंचायत कार्यालय हे सर्व सुशोभित केले असून पर्यावरणपूरक, स्वच्छ व हरित गावाच्या दिशेने नावझेचा प्रवास प्रगतीपथावर आहे.
मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने गावातील प्रत्येक नागरिकात अभिमानाची लाट दौडली असून इतर ग्रामपंचायतींसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण बनले आहे.
सर्वांच्या सहकार्याने घडले यश
गटविकास अधिकारी संजय भोये तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने कामाचा वेग वाढविला. या यशामध्ये सरपंच दामोदर सुक्ररया लाबड, उपसरपंच प्रफुल वसंत पाटील, ग्रामपंचायत अधिकारी मानसी मयूर लाटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांचे विशेष योगदान राहिले. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा सेविका, बचत गट, सीआरपी, पोलीस पाटील, विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, कृषक बचत गट, बाळगोपाळ आणि सर्व ग्रामस्थ यांच्या एकजुटीमुळे हा मानाचा मुकुट गावाला प्राप्त झाला आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!