*पत्रकार सचिन जगताप यांना पितृशोक

*
पालघर, ता. 11मार्च : पालघर जिल्ह्यातील पत्रकार सचिन जगताप यांचे वडील नामदेव हरी जगताप (71) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (ता. 10) रोजी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सुरुवातीला नामदेव जगताप हे गिरणी कामगार म्हणून मुंबईत होते. त्यानंतर त्यांनी दुग्धव्यावसाय विभागात पालघर येथे नोकरी केली. त्यांनी एसटी महामंडळातही काम केले आहे. सेवानिवृत्त जीवन जगत असताना अचानक काही दिवसांपूर्वी ते आजारी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ते मूळचे कोल्हापूर येथील असले तरी ते कुटुंबासह पालघरमध्ये स्थायिक झाले होते. त्यांच्यावर पालघर पूर्वेकडील स्मशानभूमीत बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय पदाधिकारी आणि जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी नानी, मुले नरेंद्र व सचिन तसेच सुना नातवंडे असा परिवार आहे.

