परूळेकर महाविद्यालयात महाविद्यालयात महिला अत्याचार प्रतिबंधाबाबत जनजागृती* *“शिक्षण हेच महिलांच्या प्रगतीचे तसेच सशक्तिकरणाचे साधन आहे*– प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत


*परूळेकर महाविद्यालयात महाविद्यालयात महिला अत्याचार प्रतिबंधाबाबत जनजागृती*

*“शिक्षण हेच महिलांच्या प्रगतीचे तसेच सशक्तिकरणाचे साधन आहे*– प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत

Oplus_16908288

आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे महिला विकास कक्षाच्या वतीने व प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त *“महिला लैंगिक अत्याचार”* या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक मा. योगिता गुजर तलासरी पोलीस स्टेशन या प्रमुख पाहुण्या म्हणून, तर मुख्य हवालदार मा. विना काकड या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कॉ. गोदावरी शामराव परुळेकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कॉम्रेड लहानू कोम यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य व सहाय्यक प्राध्यापक प्रा. निलेश साळवे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेत महिलांनी विविध क्षेत्रांत साधलेल्या प्रगतीचे वर्णन केले.

यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पोलीस उपनिरीक्षक मा. योगिता गुजर, यांनी आदिवासी भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार व अन्यायाच्या विविध बाबींवर प्रकाश टाकत अशा प्रकारच्या अन्याय व अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करून त्या परीक्षांना सामोरे जाण्यास प्रोत्साहित केले.
तसेच त्यानंतर महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक भास्कर गोतीस यांनी देखील विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षण तसेच स्त्री सशक्तीकरणाविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींनी स्वतःचे सामर्थ्य ओळखून कठोर परिश्रमांच्या जोरावर यश संपादन करावे, असे मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर *“शिक्षण हेच स्त्री सशक्तीकरणाचे व प्रगतीचे खरे साधन आहे”* ही बाब त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित केली.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. होन सर, सहाय्यक प्राध्यापक प्रा. भास्कर गोतीस तसेच इतर सर्व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्राध्यापिका दिपाली भापकर तसेच आभार प्रदर्शन डॉ. नम्रता चौधरी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला विकास कक्षातील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!