पालघर काँग्रेस जिल्हाध्यक्ष ‘ऍक्शन मोड’मध्ये कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा जिल्हाभर दौरा; पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर


पालघर काँग्रेस जिल्हाध्यक्ष ‘ऍक्शन मोड’मध्ये
कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा जिल्हाभर दौरा; पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर

आजचे प्रवचनकार
Oplus_16908288
Oplus_16908288

पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्यानंतर कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तातडीने कामाला सुरुवात केली असून, ते सध्या पूर्णपणे ‘ऍक्शन मोड’मध्ये दिसून येत आहेत. आज पालघर येथील काँग्रेस भवनात आयोजित बैठकीत त्यांनी माजी पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या बैठकीत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पुन्हा नव्याने उभारणी करण्याचा निर्धार व्यक्त करताना कॅप्टन सत्यम ठाकूर म्हणाले की, “पालघर जिल्ह्यात काँग्रेसचे पुन्हा जुने वैभव निर्माण करण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम केले जाईल. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न राहील.”
बैठकीदरम्यान विविध तालुक्यांतील संघटनात्मक परिस्थिती, पक्ष विस्तार, युवकांना संधी, बूथ स्तरावरील मजबुतीकरण तसेच आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील प्रश्न आणि संघटनात्मक अडचणी मांडल्या.
दरम्यान, कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी उद्यापासून जिल्हाभर दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती दिली. या दौऱ्यात ते पालघर, बोईसर, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या भागांना भेट देणार आहेत. सलग तीन दिवस चालणाऱ्या या दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेस समर्थकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत.
“फक्त कार्यालयात बसून राजकारण न करता थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे. जिथे संघटनात्मक कमतरता आहेत, तिथे सुधारणा करून पक्ष अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या या आक्रमक आणि संघटनाभिमुख भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात जिल्हा काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!