पालघर जिल्हा परिषद कार्यलय समोर पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्ती न दिल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा…


पालघर जिल्हा परिषद कार्यलय समोर पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्ती न दिल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा…

Oplus_19005442

पालघर  दि १८:-पालघर जिल्हा येथील पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी शासनाकडून नियुक्ती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दीर्घकाळापासून प्रतीक्षा करूनही नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे उमेदवारांनी आता बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
उमेदवारांचे म्हणणे आहे की, आवश्यक पात्रता, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण करूनही नियुक्ती जाहीर होत नसल्याने त्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. अनेक उमेदवार बेरोजगार अवस्थेत असून आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
या संदर्भात संबंधित विभाग व महाराष्ट्र शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा उमेदवार प्रतिनिधींनी दिला आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडूनही करण्यात येत आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!