पालघर जिल्ह्यात ‘आम्ही भारताचे लोक’ संविधान जागर कार्यक्रम उत्साहात


 

पालघर जिल्ह्यात ‘आम्ही भारताचे लोक’ संविधान जागर कार्यक्रम उत्साहात

Oplus_16908288

पालघर दि २७:-
पालघर जिल्ह्यात पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आंबेडकर सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही भारताचे लोक’ या संकल्पनेतून संविधानाच्या मूल्यांचा जागर करणारा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात संविधान अभ्यासक राजकुमार पाईकराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीची पार्श्वभूमी, त्यातील मूलभूत मूल्ये, समता–स्वातंत्र्य–बंधुतेचे महत्त्व तसेच लोकशाहीची जबाबदारी यावर सखोल आणि प्रेरणादायी भाषण केले. नागरिकांनी संविधानाचे मूल्य प्रत्यक्ष आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजकुमार पाईकराव, गोडबोले मॅडम, प्रवीण कुराडे तसेच डॉ. रोहन सोनवले उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने अध्यक्ष ॲड. दीपक सदावर्ते, सचिव मिलिंद भदाणे, सहसचिव सचिन कुमार सावळे, खजिनदार राजेंद्र म्हस्के, सहखजिनदार प्रसाद कासले तसेच संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे संविधानाबाबत जनजागृती वाढून नागरिकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव दृढ झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

 


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!