पालघर जिल्ह्यामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*


*पालघर जिल्ह्यामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*

Oplus_16908288
Oplus_16908288

पालघर दि,८ मार्च: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिन उत्साहात पालघर मध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर महिलांसाठी क्रिकेटचे सामने, आयोजित करण्यात आले होते. तसेच महिला व विद्यार्थिनींना समाजामध्ये सक्षम स्त्री म्हणून कसे जगावे यासाठी,” व्याख्यान” आयोजित करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पालघर जिल्ह्यामधील, ज्या विद्यार्थिनी खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविला आहे. यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालघरच्या, उपजिल्हाधिकारी सीमा राऊत, या उपस्थित होत्या, तसेच आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उपेंद्र घरत, मुख्याध्यापिका विभूती मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मयूर कोल्लम, अमृत घाडगे, निलेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
विजयी संघाना तसेच राज्य राष्ट्रीय खेळाडूंना, सन्मानचिन्ह व ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव, यांची पुस्तिका देण्यात आली.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!