पालघर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘उत्तम घरत, कैलास म्हात्रे,उतम पिंपळे’ व प्रितम राऊत मैदानात चौरंगी लढतीकडे लक
I

पालघर – नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, चारही गटांतील प्रमुख चेहरे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.शिवसेना एकनाथ गटातून उत्तम घरत भाजपामधून कैलास म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाततून उत्तम पिंपळे, आणि काॅग्रेस मधून प्रितम राऊत या चारजणामध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी मिळवत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी उभे राहिल्याने या पदावर चुरस वाढली आहे हे चारही नेते आपल्या पक्षातूनकाम करत आहेत. मात्र राज्यातील राजकीय उलथापालथ, गटबाजी, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि पक्षांतरण यामुळे आज चारही वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता वेगवेगळ्या गटातून एकमेकांविरोधात’ निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
पालघर नगरपरिषद परिसरात सर्वच उमेदवारांची चांगली ओळख, कार्यकर्त्यांचा मजबूत संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील पकड लक्षात घेता निवडणूक काट्याची होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. नागरिकांसाठी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, बाजारपेठ विकास, तसेच किनारपट्टी भागातील सुरक्षा उपाययोजना असे अनेक मुद्दे प्रचारात ऐरणीवर येणार आहेत.
स्थानीय कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाची स्थिती असून अनेक जुन्या निष्ठावंतांनी नेमकं कोणत्या गटाला साथ द्यावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तिन्ही उमेदवारांना त्यांच्या-त्यांच्या गटाकडून जोरदार पाठींबा मिळत असला तरी, अंतिम निर्णय मतदारांच्या मनातील बदलत्या प्रवाहावर अवलंबून असेल.
पालघर शहरातील सर्वसामान्य मतदारांमध्ये या अनोख्या लढतीची उत्सुकता वाढली असून, कोण नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

