पालघर नगर परिषद निवडणुकीत मनकवल सिंह(डायमंड) प्रचारात आघाडी


पालघर नगर परिषद निवडणुकीत मनकवल सिंह(डायमंड) प्रचारात आघाडी

पालघर– पालघर नगर परिषद निवडणुकीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या दमदार उमेदवार मनकवल सिंह चड्डा (डायमंड)यांना रिंगणात उतरवून राजकीय वातावरणच तापवले आहे. स्वच्छ कारभार, पारदर्शक विकास आणि प्रभागातील लोकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे मनकवल सिंह चड्डा (डायमंड) आता अधिकृतपणे निवडणूक लढवित आहेत
विरोधकांच्या खांद्यावरचं ओझं वाढलं आहे.
स्थानिकांमध्ये डायमंड यांची प्रतिमा कामसू, अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर थेट हाताळणी करणाऱ्या नेत्याची आहे. त्यांना अनेक मतदार पाठिंबा देत आहेत.पालघरमध्ये मनकवल सिंह चड्डा हे डायमंड या नावाने परिचित आहेत.ते अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असतात अनेक लोकांना मदत करतात . येणाऱ्या नगरसेवक पदाकरीता ते निवडणूक लढवित आहेत.
“पालघरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. भ्रष्टाचारमुक्त, लोकाभिमुख आणि गतिमान पालघर हीच माझी प्राथमिकता असेल.”

या उमेदवारीमुळे पालघर नगर परिषद निवडणूक अधिक चुरशीची होणार हे निश्चित.
स्वच्छ प्रभाग, स्वच्छ पालघर, गल्लीत गल्लीत चांगल्याप्रकारे लाईटांची सोय, पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती ,महीला सुरक्षा आणि सुविधा अशा अनेक योजना राबविण्याचा त्याचा मानस आहे.
नागरिकांमध्ये डायमंड हे प्रचारात आघाडी वर आहेत. आगामी दिवसांत डायमंड यांचा प्रचार आणखी वेग घेणार आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!