राज्यातील २९ महानगरपालिकाची १५ जानेवारीला मतदान
राज्यातील सर्व २९महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मजमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज केली. यासाठी २३ डिसेंबर पासून ३० डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी ३१ डिसेंबरला होईल आणि २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला अंतिम उमेदवारांची घोषणा होईल आणि चिन्ह वाटप होईल. या निवडणुकीत एकूण २ हजार ८६९ जागांसाठी निवडणूक होईल. मुंबईत एक सदस्यीय प्रभाग रचना आहे आणि इतर ठिकाणी ४ सदस्यीय प्रभाग आहेत. काही प्रभागात ३ आणि ५ सदस्य आहेत. मतदारांना जितके प्रभाग सदस्य तितकी मत द्यावी लागतील. हे मतदान EVM वर होणार आहे. ३ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत मतदान करतील.
Views: 408

