लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक फेटाळल्यानंतर भाजपचा खोटारडेपणा उघडकीस,*”*श्रीरंग बरगे -:कॉग्रेस सरचिटणीस यांची पालघर पत्रकार परिषदेत टीका”*


 

 

*लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक फेटाळल्यानंतर भाजपचा खोटारडेपणा उघडकीस,*”*श्रीरंग बरगे -:कॉग्रेस सरचिटणीस यांची पालघर पत्रकार परिषदेत टीका”*

Oplus_16908288

पालघर दि २५:-
पालघर – लोकसभेतील अधिवेशनात १३१ व्या घटना दुरूस्ती नाकारण्यात आल्याने, आपल्या मनमानी, हुकूमशाही पध्दतीच्या कारभाराला चपराक बसली असल्याने भाजपचा आकांड- तांडव सुरू असून या विधेयकावरून दिसून येते, भाजपने खोटारडपणाचे सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत, अशी टीका करीत श्री. श्रीरंग बरगे – सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांनी दिनांक २५ एप्रिल रोजी कॉग्रेस भवन, ता.जि.पालघर, येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, व पुढे म्हणाले. महिला आरक्षणात डिलिमिटेशन व जनगणनेची घुसखोरी न करता सध्याच्या जागांपैकी ३३% टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवा आणि २०२९ ची लोकसभा निवडणूक या महिला आरक्षणासह घ्या, अशी मागणीही केली आहे. तसेच काँग्रेससह विरोधी पक्षांना विश्वासात न घेता, महिला आरक्षणाच्या पडद्याआड लोकसभेच्या एकूण ५४३ जागेवरून त्यांची संख्या ८५० करून, सदैव भाजपच निवडणूकीत निवडून यावे, असे षडयंत्र भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचले होते. मात्र सतर्क विरोधी पक्षांनी ते उधळून लावून भाजपचा खरा चेहरा व महिलां विषयीची बेगडी आपुलकी उघडकीस आली आहे अशी टीकाही श्रीरंग बरगे यांनी केली.
महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक ह हे सप्टेंबर २०२३ मध्ये ( १०६ वी घटनादुरुस्ती) मंजूर झाले आहे. १३१ वे विधेयक हे केवळ मतदारसंघ फेररचनेशी (Delimitation) संबंधित होते. ते मंजूर न झाल्याने महिला आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. २०२३ चे महिला आरक्षण विधेयक पारीत होतानाच भाजपने या विधेयकाच्या अंमलबजावणीत डिलिमिटेशन व जनगणनेची पाचर मारून ठेवली, कसाही आरोपही श्रीरंग बरगे यांनी बोलताना केला आहे. पुढे सांगतात, मोदी सरकारला लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० करायच्या होत्या. कारण महाराष्ट्र व दक्षिण भारतातील ज्या राज्यांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण केले. यामुळे या ठिकाणी त्यांच्या जागा कमी प्रमाणात वाढणार आणि उत्तर भारतातील लोकसंख्या वाढती असल्याने तेथील जागा मोठ्या प्रमाणात वाढणार होत्या. लोकसंख्यावर नियंत्रण करणाऱ्या प्रगत राज्यांना, राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा हा भाजपचा डाव होता. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी व महाराष्ट्रासह दक्षिण, पूर्व भारतात. राजकीय प्रभाव टिकवण्यासाठी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मनापासून स्वागत करते, असेही श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
देशात महिलांना सर्वप्रथम राजकीय आरक्षण काँग्रेसनेच दिले आहे, कारणं स्व. राजीव गांधींनी पंतप्रधान असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाची संकल्पना मांडून. त्यासाठीचे पंचायत राज विधेयक लोकसभेत पारीत केले. आणि काँग्रेसच्या नरसिंह राव सरकारने हे आरक्षण प्रत्यक्षात लागू केले. त्यानंतर डॉ.मनमोहन सिंग सरकारने ३३ टक्क्यांचे आरक्षण ५० टक्के केले. महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयकही सर्वप्रथम संसदेच्या एका सभागृहात काँग्रेसच्या नेतृत्वातील डॉ. मनमोहन सिंग सरकारने पारीत केले आहे. तसेच राज्यसभेत हे विधेयक २०१० साली पारीत झालेले होते. देशाला पहिली महिला पंतप्रधान, महिला राष्ट्रपती, महिला मुख्यमंत्री, महिला राज्यपाल आणि लोकसभा अध्यक्ष काँग्रेसनेच दिलेला आहे. भाजपा चेहरा हा दुटप्पी असून, निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसवून घाईघाईने विधेयक लोकसभेत विधेयक मांडून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत, महिला सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या भाजपने आजवर एकाही महिलेला पक्षाध्यक्ष केलेले नाही. असा टोलाही श्रीरंग बरगे यांनी लगावला आहे.
या पत्रकार परिषदेला पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मनीष गणोरे , सिकंदर शेख, अध्यक्ष पालघर तालुका काँग्रेस, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष , सीमा पोतदार, संगीता धोंडे, श्वेता पाटील, ॲड प्रीती तिवारी, जिल्हा सरचिटणीस मनोज पाटील , सुरेंद्र शेट्टी, रोशन पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!