- समाजसेविका डॉ सौ.रजनी चक्रे यांना स्व. सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार!

Oplus_16908288 
Oplus_16908288 - अकोला (प्रतिनिधी) – गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला द्वारा मलकापूर येथील समाजसेविका डॉ सौ. रजनी भिमराव चक्रे यांना जागतिक महिला दिनी “स्व. सिंधुताई सपकाळ स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बाल कल्याण सभापती सौ. आरती घोगलिया, सौ. हरिदिनी भिसे, श्रीमती कमलाबाई खडसे, डॉ.संजय तिडके, गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रोहन बुंदेले, सचिव सौ.ईशिका चंदन आदी मान्यवर उपस्थित होते. समाजसेविका डॉ सौ.रजनी चक्रे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या आजीवन सदस्या आहेत. दरवर्षी २६ नोव्हेंबरला “भारताचे संविधान” पुस्तिकेचे शालेय विद्यार्थ्यांना वाटप करतात, हे उल्लेखनीय! तसेच अनाथ आश्रमात जाऊन भोजनदान, कपडे व ब्लँकेट वाटप करुन स्वतःचा वाढदिवस दरवर्षी साजरा करतात. गोरगरीब व होतकरु पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य व ड्रेस देऊन मदत करतात. विविध शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करतात. तसेच महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बचतगट स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करुन स्वयं रोजगार उपलब्ध करुन देतात. समाजसेविका डॉ सौ. रजनी चक्रे यांना “स्व. सिंधुताई सपकाळ स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार” मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे! —————————
Views: 128

