पतपेढीच्या अध्यक्ष पदी संतोष पावडे तर संचालकपदी मायकल सर यांची बिनविरोध निवड
पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या आज झालेल्या निवडणुकीत *पतपेढी अध्यक्षपदी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष पावडे यांची दुसऱ्यांदा निवड तर वसई विभाग रिक्त संचालक पदी संघटना व पतपेढी समन्वयक मायकल सर यांची बिन विरोध निवड करण्यात आली.* पालघर ठाणे जिल्हा अशा दोन जिल्ह्यात कार्यरत असणारी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीचे 2700सभासद असून 170कोटी भागभांडवल आहे. पतपेढीचे कार्यक्षेत्र पालघर, आणि ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा भाईंदर,वसई ,विरार,पालघर ,डहाणू,तलासरी,जव्हार आणि वाडा तालुक्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सभासद आहेत.पतपेढीच्या मालकीची भाईंदर,वसई, सफाळे,पालघर आणि डहाणू येथे स्वतःच्या मालकीची कार्यालये असून पालघर येथील वळण नाका माहिम रोड पालघर येथे भव्य सभागृह आहे.*राज्यातील पगारदार कर्मचारी वर्गाची आदर्श कारभार करणारी पतपेढी अशी ओळख निर्माण केलेली पतपेढीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा संतोष पावडे यांची निवड झाली आहे*.अनेक वर्षे संघटना मध्ये काम केले असून 6वर्षे पतपेढीचे अध्यक्ष होते.सामाजिक, शैक्षणिक,सहकार क्षेत्रात गेली 35 वर्षे कार्यरत असलेले संतोष पावडे यांच्या निवडीने पतपेढीच्या विकासात्मक ,पारदर्शक आणि सभासद भीमुख काम होईल अशी आशा सभासद शिक्षक वर्गाकडून व्यक्त करण्यात


