वाड्यातील अवैध फटाका कारखान्यात स्फोट २० वर्षीय कामगाराचा करूण अंत: परिसरात हळहळ


  1. वाड्यातील अवैध फटाका कारखान्यात स्फोट
    २० वर्षीय कामगाराचा करूण अंत: परिसरात हळहळ

    Oplus_16908288
    Oplus_16908288


    वाडा/प्रतिनिधी : तालुक्यातील कोनसई गावाच्या आडबाजूला एका खाजगी जागेत पत्र्याची शेड उभारून अवैधरित्या सुरू असलेल्या फटाका कारखान्यात झाल्याच्या प्रचंड मोठ्या स्फोटात एका २० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. स्फोट इतका मोठा होता की, या कामगाराचे शरीर छिन्नविछिन्न होत सुमारे ८० ते १०० मीटरवर शरीराचे अवयव फेकले गेले असून अन्य चार महिला कामगारही जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तर तीन महिलांवर वाड्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    कोनसई गावातील वसंत नाईक यांच्या मालकीच्या जागेत शेड उभारून नरेंदर सिंग आणि यादव यांनी काही महिन्यांपूर्वी सुतळी बाँब बनविण्याच्या कारखाना सुरू केला होता. या कारखान्यात मृत भावेश वावर ( वय २०) रा. वावरेपाडा, जामघर यांच्यासह सुमारे २८ महिला रोजंदारीने काम करत होत्या. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कामगार भावेश वावर हा सुतळी बाँब साठी लागणाऱ्या दारूचे मिश्रण हाताने तयार करत असतांना अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले असून जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा महिला कामगार जखमी झाल्या आहेत. यातील मोनिका पडवळे ( वय ३०, रा. पालसई ) ह्या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर मोनिका जाधव( वय– ३०, रा. कोनसई) जागृती गवते ( वय – २७, रा. जामघर), प्रतिभा पवार ( वय –३०, रा. कोनसई ) अर्चना मिसाळ, जयश्री गरळ जखमी असून त्यांच्यावर वाड्यातील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
    मरण पावलेल्या युवकाचा मृत देह घेऊन जाणाऱ्या शव वाहिनीचा रस्ता मृत व्यक्तीचा रस्ता नातेवाईकांना अडवला जोपर्यंत कंपनीचा मालक येत नाहीत तोपर्यत आम्ही मृत देह सोडणार नाही.
    दरम्यान या कंपनीला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती तसेच ही कंपनी ६ महिने पासून सुरु होती मात्र प्रशासनला कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    या घटनेची माहिती मिळताच वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उप विभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर,वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे, यांनी घाटना स्थलाची पाहणी करून संबधितांवर कारवाई करण्याची आश्वासन दिले..


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!