भागातील विद्यार्थ्यांच्या ll RTE नियमावलीबाबत फेरविचार करण्याची मागणी
पालघर लोकसभा मतदारसंघातील पालक-शिक्षक संघटना तसेच स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब यांना RTE अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन नियमावलीबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर नवीन नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १ कि.मी. परिसरातील शाळांना प्राधान्य देणे तसेच निवास प्रमाणपत्रांची कडक पडताळणी करण्याची अट लागू करण्यात आली आहे. ही नियमावली शहरी भागासाठी उपयुक्त ठरू शकते; मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात शाळांमधील अंतर, वाहतूक सुविधा तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सदर नियमावलीचा पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळावी या उद्देशाने RTE च्या नवीन नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात यावेत, अशी विनंती शिक्षण मंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार जनसंपर्क कार्यालय

