हरी सन स्टील कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
रासायनिक सांडपाणी बंद करून ; शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी
Oplus_16908288Oplus_16908288
वाडा/प्रतिनिधी : तालुक्यातील नेहरोली गावामध्ये हरी सन स्टील ही कंपनी असून या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भंगार वितळवून त्यापासून सलाई बनवण्याचे काम केले जाते कंपनीतून निघणाऱ्या प्रदूषित केमिकल मिश्रित पांढऱ्या रंगाचे सांडपाणी अंकुश पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जात असून ती शेतजमीन खराब होऊन नापीक झाली आहे. शेतकऱ्याने वारंवार शासन दरबारी लेखी तक्रारी करून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या जमिनीपासून शेतकऱ्याला लाखो रुपयांची उत्पन्न मिळत होते मात्र कंपनीच्या केमिकल मिश्रित सांडपाण्याने या शेतामध्ये कोणतेही पिक येत नसल्याने शेतकऱ्यावर ही जमीन ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांनी कंपनी मालकाला वेळोवेळी सांगूनही कंपनी मालक मात्र कानाडोळा करत असल्याचे शेतकऱ्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.लवकरात लवकर केमिकलयुक्त सांडपाणी बंद करून व झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.