*महाराष्ट्राला नवी उंची व आयाम देणारा अर्थसंकल्प: आ. राजन नाईक*
Oplus_16908288
राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला नवी उंची व प्रगतीला नवा वेग मिळणार असून, विकसित महाराष्ट्राकडे वेगाने नेणारा आजचा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, आदिवासी आणि नवउद्योजकांसाठी अर्थसंकल्पात अभिनव योजना आहेत. शहरे व ग्रामीण भागाच्या नियोजनबद्ध विकासाला अर्थसंकल्पातून चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला हा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्राला नवा आयाम देणारा ठरेल.
पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे चौथी मुंबई विकसित होणार आहे. उत्तन ते विरार सागरी सेतूचे कामही लवकरच सुरू होणार आहे. पनवेल – वसई उपनगरी कॉरिडॉरचा अर्थसंकल्पात उल्लेख झाला असून, वसई-विरारच्या विकासाची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा प्रथमच आकांक्षित तालुका योजनेत समावेश होणार आहे, ही आनंदाची बाब आहे.
राज्यातील हजारो शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान मिळेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्यामुळे लाभार्थी महिलांना चिंता राहणार नाही. भविष्यात २५ लाख महिला लखपती दीदी होतील. राज्याच्या प्रत्येक विभागाचा व समाजाच्या प्रत्येक क्षेत्राचा विचार करून अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात आल्या आहेत. एक हजार लोकसंख्येच्या गावापर्यंत काँक्रीट रस्त्यामुळे प्रत्येक गावाबरोबर आता संपर्क होईल. ७५ हजारांहून अधिक जागांची भरती केली जात असल्यामुळे युवा वर्गाला नोकरीची संधी मिळेल. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार असल्यामुळे स्थानिक रोजगारामध्येही वाढ होईल.n