जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन* *जनगणना २०२७ ची तयारी वेगात माहिती संकलनास सुरुवात* *नागरिकांनी स्वगणनेत सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे* *पालकमंत्री गणेश नाईक*


*जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन*

*जनगणना २०२७ ची तयारी वेगात माहिती संकलनास सुरुवात*

*नागरिकांनी स्वगणनेत सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे*

*पालकमंत्री गणेश नाईक*

पालघर १ मे : जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात प्रशासनाने डिजिटल युगातील महत्त्वाचा टप्पा गाठत जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाचे उद्घाटन वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले.
भारताची १६ वी जनगणना ठरणारी ही प्रक्रिया यावेळी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून मोबाईल अँप आणि अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. https://se.census.gov.in या संकेतस्थळावरून नागरिक स्वतःची व घराची माहिती नोंदवू शकणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने यासाठी स्वतंत्र जनगणना समिती स्थापन केली असून जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड या प्रधान जनगणना अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांची जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून, तर उपजिल्हाधिकारी (सा.प्र) रणजित देसाई यांची अतिरिक्त जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जनगणनेची संपूर्ण माहिती CMMS पोर्टलद्वारे संकलित होणार असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करणार आहेत.
विशेष म्हणजे, यंदाच्या जनगणनेत प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार असून यामुळे सामाजिक व आर्थिक धोरणांच्या आखणीस महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे. याआधी जिल्हा मुख्यालयात मास्टर ट्रेनरमार्फत फिल्ड ट्रेनरना प्रशिक्षण देण्यात आले असून २३ एप्रिल ते ८ मे दरम्यान प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे.
दरम्यान, पालघर नगरपरिषद क्षेत्रातील रामकृष्ण गार्डन सोसायटी परिसरात स्वगणनेचा शुभारंभ पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला
या कार्यक्रमास आमदार राजेंद्र गावीत, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड़, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) रणजीत देसाई,शिक्षण समिती सभापती प्रियंका म्हात्रे, नियोजन समिती सभापती जस्वीन घरत, महिला बालकल्याण सभापती शिल्पा बाजपेई, बांधकाम सभापती चंद्रशेखर वडे, गटनेता भावानंद संखे , नगर प्रशासन जिल्हा सह आयुक्त श्याम पोशट्टी, उपविभागीय अधिकारी पालघर व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांना आवाहन करताना, “स्वगणनेत सक्रिय सहभाग नोंदवून तसेच प्रगणकांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे,” असे सांगितले.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!